मुंबई, चेन्नई, हैदराबाद शहरे केंद्रशासित प्रदेश बनतील ;असदुद्दीन ओवैसी यांचे परखड मत

कलम ३७० हटवल्यानंतर सर्वात जास्त नुकसान जम्मूच्या डोगरा व लडाखच्या बौद्धांचे होईल. त्यांना लोकप्रतिनिधी संख्येतील बदलाचा सामना करावा लागेल
मुंबई, चेन्नई, हैदराबाद शहरे केंद्रशासित प्रदेश बनतील ;असदुद्दीन ओवैसी यांचे परखड मत

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे कलम ३७० हटवल्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी परखड मत व्यक्त केले आहे. आता भाजपला कोणीही रोखू शकत नाही. मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता ही शहरे केंद्रशासित बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की, लडाखमध्ये उपराज्यपालाद्वारे राज्य कारभार केला जात आहे. तेथे जनप्रतिनिधित्व नाही. कलम ३७० ज्या पद्धतीने हटवण्यात आले, हे संवैधानिक नैतिकतेचे उल्लंघन आहे.

कलम ३७० हटवल्यानंतर सर्वात जास्त नुकसान जम्मूच्या डोगरा व लडाखच्या बौद्धांचे होईल. त्यांना लोकप्रतिनिधी संख्येतील बदलाचा सामना करावा लागेल. राज्याचा दर्जा बहाल करायला निश्चित कालावधी का नाही, असा प्रश्न त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारच्या शासनाची पाच वर्षे पूर्ण झाली. आता राज्यात तात्काळ विधानसभेच्या निवडणुका व्हायला हव्यात. हे राज्य भारताचे अविभाज्य अंग आहे, यात कोणताही संशय नाही, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in