एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये पाच टक्के वाढ

कंपनीचे शेअर्स ५ टक्के वाढून ४०७.६० रुपये एनएसईवर जात ५२ आठवड्यातील उच्चांक गाठला
एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये पाच टक्के वाढ

अदानी समूह एनडीटीव्हीच्या प्रमोटर्सकडील २९.१८ टक्के हिस्सा ताब्यात घेणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर गुरुवारीही एनडीटीव्ही लि.चे शेअर्स अप्पर सर्किटला लागले. एनएसई आणि बीएसईमध्ये एनडीटीव्हीचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारातच ५ टक्के वाढले आणि मग अप्पर सर्किट लागले. कंपनीचे शेअर्स ५ टक्के वाढून ४०७.६० रुपये एनएसईवर जात ५२ आठवड्यातील उच्चांक गाठला. बुधवारी हा शेअर ३८८ रुपये होता.

अशाच प्रकारे बीएसईवर एनडीटीव्हीचा शेअर ५ टक्के वधारुन ५२ आठवड्यातील उच्चांकी ४०३.६० रु.वर बंद झाला. गेल्या दोन दिवसात कंपनीचे बाजारमूल्य बीएसईवर २४१.७८ कोटींनी वधारुन २,६०२.७१ कोटी झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in