रेल्वे ऑनलाईन रिझर्व्हेशनची नवी प्रणाली ;रिकाम्या सीटची माहिती प्रवाशांना मिळणार

गाडीतील रिकाम्या सीटची माहिती यापूर्वी केवळ टीसीलाच असायची
रेल्वे ऑनलाईन रिझर्व्हेशनची नवी प्रणाली ;रिकाम्या सीटची माहिती प्रवाशांना मिळणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या अडचणी दूर करणारी सहज सोपी नवी ऑनलाईन रिझर्व्हेशन व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या व्यवस्थेअंतर्गत आता वेटींग लीस्ट वरील प्रवाशांना चार तास अगोदर तिकीट कन्फर्म झाल्याचे कळणार आहे. रेल्वे चार तास आधी एक चार्ट जाहीर करेल व नंतर गाडी सुटायच्या ३० मिनिटे आधी दुसरा चार्ट जाहीर करेल. अन्य सर्व माहिती इंडियन रेल्वे पॅसेंजर रिझर्व्हेशन इन्क्वायरी या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

गाडीतील रिकाम्या सीटची माहिती यापूर्वी केवळ टीसीलाच असायची. आता मोबाईल किंवा लॅपटॉपवर कुणीही ही माहिती मिळवू शकणार आहे. तसेच संकेतस्थळावर आता प्रत्येक डब्याचा नकाशा आणि इंजिनपासूनची जागा सुद्धा दाखवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना सहजपणे त्यांची सीट शोधता येणार आहे. ट्रेन एक-दोन मिनिटांसारखा खूप कमी वेळ स्थानकांवर थांबत असल्यामुळे प्रवाशांसाठी ही खूप उपयुक्त सुविधा ठरणार आहे. पूर्वी रिकाम्या बर्थची माहिती करंट काउंटरवरच उपलब्ध असे. ऑनलाईन बुकींगमुळे आता ही प्रक्रिया खूप पारदर्शक होणार आहे.

दररोज रेल्वेचे १३ लाख बर्थचे बुकिंग होत असते. ज्यात एक लाख तत्काळ कोट्याचाही समावेश असतो. तसेच भारतीय रेल्वेच्या दररोज १२,५०० ट्रेन धावत असतात, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in