राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल नवीन अपडेट समोर ; पंतप्रधान मोदींकडून मदतीचे आश्वासन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची त्यांच्या कुटुंबीयांकडून विचारपूस केली
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल नवीन अपडेट समोर ; पंतप्रधान मोदींकडून मदतीचे आश्वासन

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. बुधवारी जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, राजूचा मित्र आणि कॉमेडियन एहसान कुरेशी याने त्याच्या प्रकृतीबाबत नवी माहिती दिली आहे. राजू श्रीवास्तव यांचा मेंदू नीट काम करत नसल्याचे एहसान कुरेशी यांनी म्हटले आहे.

एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत एहसान कुरेशी म्हणाले, “डॉक्टरांनी कुटुंबीयांना राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे कारण ते सध्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. काही तासांपूर्वी डॉक्टरांनी सांगितले की, राजूने काही हलक्या हालचाली केल्या आहेत. परंतु त्यांचा मेंदू पूर्णपणे कार्य करत नाही किंवा प्रतिसाद देत नाही."

पंतप्रधान मोदींकडून मदतीचे आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पत्नीकडून राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पीएम मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला फोन केला. मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मदतीचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची त्यांच्या कुटुंबीयांकडून विचारपूस केली होती. राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनीही कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in