आता हॉटेल बुकिंग, टिकीट रद्द केल्यास 'रिफंड’ रकमेवर जीएसटी भरावा लागणार

अर्थ मंत्रालयाच्या कर संशोधन विभागाने याबाबत स्पष्टीकरण देणारी तीन पत्रके प्रसिद्ध केली आहेत
आता हॉटेल बुकिंग, टिकीट रद्द केल्यास 'रिफंड’ रकमेवर जीएसटी भरावा लागणार

दूरच्या प्रवासाला जाण्यासाठी आपण हॉटेल बुकिंग करतो, रेल्वेचे तिकीट बुक करतो, नाटक-सिनेमा पाहायला तिकीट काढतो. आता हे तिकीट रद्द केल्यास आपल्याला ‘रिफंड’ रकमेवर जीएसटी भरावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जीएसटीचा मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. हा नियम सर्व प्रकारच्या बुकिंगसाठी लागू असेल.

केंद्रीय अर्थ खात्याने याबाबतचे स्पष्टीकरण दिले की, रेल्वे, हॉटेल किंवा नाटक किंवा चित्रपट तिकीट रद्दीकरण शुल्कावर अतिरिक्त पैसे जीएसटीच्या स्वरूपात भरावे लागतील. अर्थ मंत्रालयाच्या कर संशोधन विभागाने याबाबत स्पष्टीकरण देणारी तीन पत्रके प्रसिद्ध केली आहेत. या पत्रकात नमूद केले की, जेव्हा तुम्ही कोणतेही बुकिंग करता, तेव्हा तुम्ही करार करता. तुमचे बुकिंग तुम्ही रद्द करता, तेव्हा तो करार रद्द केल्यासारखे होते, कारण त्याबदल्यात तुम्हाला सेवा मिळत असते. या तीन पत्रकांपैकी एका परिपत्रकात याच करार भंगाचा उल्लेख करण्यात आला आहे.

जेव्हा ग्राहक हा करार रद्द करतो, तेव्हा सेवा प्रदात्याला रद्दीकरण शुल्क म्हणून उत्पन्न मिळते. रद्दीकरण शुल्क ही सेवा आहे आणि सेवा रद्द करण्याची विशिष्ट किंमत असते. त्यामुळे त्या उत्पन्नावर जीएसटी आकारला जातो. तिकीट रद्द केल्यावर रद्दीकरण शुल्कावर जीएसटी आकारला जाईल. जर तुम्ही रेल्वेचे तिकीट खरेदी केले असेल आणि त्यावर रद्दीकरण शुल्क ५०० रुपये असेल तर ५०० रुपयांवर जीएसटी लागू होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in