...तेव्हाच ही व्यवस्था खऱ्या अर्थाने लोकांची होईल;सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांचे प्रतिपादन

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने सुप्रीम कोर्ट लॉन्स येथे देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
...तेव्हाच ही व्यवस्था खऱ्या अर्थाने लोकांची होईल;सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांचे प्रतिपादन

“आपण जेव्हा एकमेकांचा तसेच देशातील विविधतेचा सन्मान करू, तेव्हाच ही व्यवस्था खऱ्या अर्थाने लोकांची होईल,” असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सोमवारी केले.

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने सुप्रीम कोर्ट लॉन्स येथे देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला एन. व्ही. रमणा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील मत वक्तव्य केले.

“फक्त वसाहतवादापासून मुक्ततेसाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नव्हता. तर हा लढा सर्वांच्या सन्मानासाठी तसेच लोकशाहीची स्थापना करण्यासाठी लढण्यात आला होता. लोकाशाहीचा पाया रचण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून झाले. संविधान सभेमध्ये सखोल विचारविनिमय करून आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या भारतीय संविधानाची निर्मिती झाली,” असे रमणा म्हणाले.

रमणा यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, सदर पटेल, सीआर दास, लाला लजपत राय, आंध्र केसरी टंगुतुरी प्रकाशम पंतुलू यांचा उल्लेख केला. तसेच सैफुद्दीन किचलू आणि पीव्ही राजमन्नर यांनी स्वातंत्र्याचा लढा रस्त्यापासून न्यायालयातपर्यंत लढला. यामुळेच स्वातंत्र्य मिळणे शक्य झाले, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in