उत्तर प्रदेशात पाकिस्तानी एजंट

मोहम्मद रईसला अटक
उत्तर प्रदेशात पाकिस्तानी एजंट
Published on

लखनऊ : उत्तर प्रदेश एटीएसने गोंडा जिल्ह्यात राहणाऱ्या मोहम्मद रईसला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.

रईस हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय एजंट म्हणून काम करत होता. चौकशीनंतर रईसला अटक केली आहे. मुंबईच्या अरमान या तरुणाने पाकिस्तानी एजंट रईसशी चर्चा घडवली होती.

रईसला सौदी अरेबियात नोकरी देतो, असे सांगून त्याच्याकडून हेरगिरी करवली जात होती. सैन्य दलाच्या तळाची छायाचित्रे पाठवल्याबद्दल रईसला १५ हजार रुपये मिळाले होते. रईसने आपला मित्र सलमान व अन्य लोकांना हेरगिरीच्या कामासाठी लावले होते. भारतात मुस्लिमांवर होणारे अत्याचार व बाबरी मशिदीबाबत चर्चा करून तरुणांना पाकिस्तानचे हेर बनवले होते.

एटीएस आता रईसच्या मोबाईलमधील डेटाचा तपास करत आहे. सोबत अरमान व सलमानच्या अटकेसाठी एटीएस मुंबईला रवाना झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in