विभाजन व ध्रुवीकरणामुळे भारताच्या विकासाच्या मूलतत्वांना मोठा धक्का बसणार

 विभाजन व ध्रुवीकरणामुळे भारताच्या विकासाच्या मूलतत्वांना मोठा धक्का बसणार

भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलतत्व मजबूत आहेत. पण, विभाजन व ध्रुवीकरणामुळे भारताच्या विकासाच्या मूलतत्वांना मोठा धक्का बसत आहे, असा इशारा जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, भारतात बेरोजगारी व कामधंदा नसणे हे मोठे आव्हान आहे. भारतात तरुणामधील बेरोजगाराचा दर २४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जगातील सर्वाधिक बेरोजगार असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. कोणत्याही देशाचा विकास हा केवळ आर्थिक धोरणांवर अवलंबून नसतो. लोकांमध्ये विश्वास असल्यास देश हा आर्थिकदृष्ट्या सफल होतो. भारतीय समाजात विभाजन व ध्रुवीकरण वेगाने वाढत आहे. ही बाब दु:खदायक आहे. त्यामुळे देशाच्या विकासाला मोठे नुकसान लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे मजबूत आहेत. भारतात मोठा उद्योगी वर्ग असून अत्यंत कुशल कामगार, मोठी गुंतवणूक आहे. महागाईबाबत ते म्हणाले की, भारत ज्या महागाईला बघत आहे. ती एक जागतिक घटना आहे. कोविड महामारी व युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळी परिणांमामुळे झाली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in