
सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. शिवसेना आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले असून हे साम, दाम, दंड, भेद चा वापर करुन भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून सरकार स्थापन करत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यातील एका कार्यक्रमात एकाच मंचावर येणार आहेत. यंदाचा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतिने दिला जाणार लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.
१ ऑगस्ट या लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण केलं जातं. या वर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या वितरण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराच्या वितरण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.