पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्यात जपानी उद्योगपतींसोबत घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्यात जपानी उद्योगपतींसोबत घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जपान दौऱ्यात जपानच्या विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योगपतींसोबत भेट घेतल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ३४ सीईओंसोबत भेट घेऊन चर्चा केली. मोदी म्हणाले की, भारताच्या विकासात जपानचे योगदान मोठे आहे. सॉफ्टबँक कॉर्पोरेशनचे संचालक मंडळावरचे संचालक आणि संस्थापक मासायोशी सोन यांची मोदी यांनी टोकियो येथे भेट घेतली. भारताच्या स्टार्टअप क्षेत्रांतील सॉफ्टबँकच्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.तसेच त्यांनी तंत्रज्ञान, ऊर्जा आणि वित्त यासारख्या भारतातील महत्त्वाच्या क्षेत्रांमधील सॉफ्टबँकच्या भविष्यातील सहभागावर चर्चा केली.

भारतात व्यवसाय सुलभतेसाठी(ईझ ऑफ डुईंग बिझनेस) होत असलेल्या विविध सुधारणांवर त्यांनी चर्चा केली. भारतात सॉफ्टबँकेची गुंतवणूक वाढवता येईल असे विशिष्ट प्रस्ताव या भेटीत सामायिक करण्यात आले.

सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे वरिष्‍ठ सल्लागार ओसामू सुझुकी यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी पंतप्रधानांनी, सुझुकी यांचे भारताशी असलेले संबंध आणि भारतातले योगदान यांचे स्मरण करत भारतातल्या वाहन उद्योगामध्‍ये सुझुकी मोटर्सने बजावलेल्या परिवर्तनात्मक भूमिकेची प्रशंसा केली. वाहन उद्योग आणि वाहनांचे सुट्टे भाग क्षेत्रातल्या, उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजने अंतर्गत स्वीकृत अर्जदारांपैकी सुझुकी मोटर गुजरात प्रायव्‍हेट लिमिटेड आणि मारूती सुझुकी इंडिया लिमिटेड असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

शाश्‍वत विकासाचे लक्ष्‍य साध्‍य करण्‍यासाठी इलेक्िट्रक वाहने आणि बॅटरीच्या उत्‍पादनाची सुविधा तसेच पुनर्वापर केंद्रे उभारण्‍यासाठी भारतामध्‍ये आणखी गुंतवणूक करण्‍यासाठी असलेल्या संधींविषयी उभय नेत्यांमध्‍ये यावेळी चर्चा झाली. जपान- इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग (जेआयएम) आणि जपान एनडोव्हड कोर्सेस (जेइसी) यांच्‍या माध्‍यमातून कौशल्य विकासासह भारतातील स्‍थानिक नवोन्मेश प्रणाली उभारण्याच्या धोरणांवरही पंतप्रधान मोदी आणि सुझुकी यांच्यामध्‍ये चर्चा झाली.

एनईसी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. नोबुहिरो एन्डो यांची भेट घेतली. भारतीय दूरसंचार क्षेत्रातील, विशेषतः चेन्नई-अंदमान आणि निकोबार द्वीप समूह आणि कोची-लक्षद्वीप बेटे येथे सुरु केलेल्या ऑप्टीकल फायबर केबल प्रकल्पांमधील एनईसी च्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेतील गुंतवणुकीच्या संधींचा प्रधानमंत्र्यांनी विशेष उल्लेख केला.

औद्योगिक विकास, कर संरचना आणि कामगार या आणि अन्य क्षेत्रांमधे व्यवसाय सुलभतेसाठी भारताने हाती घेतलेल्या विविध सुधारणांबाबत त्यांनी चर्चा केली. भारतामधील नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील संधींबाबत देखील त्यांनी चर्चा केली

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in