सरकारी कंपन्या खासगी उद्योजकांच्या हाती देण्याचे भाजपचे धोरण प्रियंका गांधी यांची टीका

मोदी म्हणतात ७० वर्षांत म्हमजे काँग्रेसच्या राजवटीत काही घडले नाही. मोदींजींनी ज्या शाळेत उपस्थिती लावली ती काँग्रेसने बांधली होती
सरकारी कंपन्या खासगी उद्योजकांच्या हाती देण्याचे भाजपचे धोरण प्रियंका गांधी यांची टीका

भोपाळ : सरकारी कंपन्यांवरील नियंत्रण खासगी उद्योजकांच्या हाती सोपविण्याचे सत्ताधारी भाजपचे धोरण आहे, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भोपाळ येथील एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना केला.

इंडियन इिन्स्टट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम),    ऑल इंडिया इिन्स्टट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) यासारख्या संस्था उभारण्यामागे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची कल्पना होती. त्यामुळे देशाला पुढे नेण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. पण भाजपच्या धोरणानुसार सरकारी कंपन्या उद्योजकांच्या हाती देण्याचे आणि लोकांचा खिसा खाली करण्याचे चालू आहे. भेलसारखी कंपनी मोदी यांच्या उद्योजक मित्रांना देण्यात आली आहे. तेथील नोकऱ्यांचे खासगीकरण, सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन थांबविले आहे आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या पैशाचे काय होईल, याची काळजी लागून राहिली आहे.

मोदी म्हणतात ७० वर्षांत म्हमजे काँग्रेसच्या राजवटीत काही घडले नाही. मोदींजींनी ज्या शाळेत उपस्थिती लावली ती काँग्रेसने बांधली होती. मोदीजी कॉलेजात गेले की नाही ते माहिती नाही पण किमा त्यांची डिग्री ज्या संगणकावर तयार केली आहे ते संगण हे काँग्रेसने दिलेले आहेत, असाही टोला यावेळी प्रियंका गांधी यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in