विदेशी गुंतवणूक संस्थांनकडून १४ हजार कोटींच्या समभागांची खरेदी

ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत त्यांनी भारतीय शेअर बाजारात २.४६ लाख कोटींच्या समभागांची विक्री केली
विदेशी गुंतवणूक संस्थांनकडून १४ हजार कोटींच्या  समभागांची खरेदी

विदेशी गुंतवणूक संस्थांनी पुन्हा खरेदी सुरु केली असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तब्बल १४ हजार कोटींहून अधिक समभागांची खरेदी केली. जुलैमधील ५ हजार कोटींची निव्वळ गुंतवणूक लक्षात घेता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील खरेदी खूप जास्त झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर सलग नऊ महिन्यानंतर विदेशी संस्थांनी खरेदीकडे मोर्चा वळवला आहे. ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत त्यांनी भारतीय शेअर बाजारात २.४६ लाख कोटींच्या समभागांची विक्री केली.

तिमाही वित्तीय निकाल आणि जागतिक घडोमोडींवर जगभरातील बाजाजारांचे कल कसे असतील यावर भारतीय शेअर बाजाराची दिशा ठरणार आहे, असे विश्र्लेषकांनी सांगितले. विदेशी गुंतवणूक संस्थांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. तर मंगळवारी मुहूरर्मनिमित्त भारतीय शेअर बाजारासह अन्य बाजारपेठा बंद असणार आहेत. या आठवड्यात तिमाही निकालाचा अखेरचा टप्पा असणार आहे. एसबीआय, एचपीसीएल, बीपीसीएल यांचे निकाल शनिवारी जाहीर झाल्याने त्यावर सोमवारी बाजारात कशी प्रतिक्रिया उमटते, हे पाहावे लागेल. अदानी पोर्टस‌्, भारती एअरटेल, पॉवरग्रीड, कोल इंडिया, आयशर मोटर्स, हिंदाल्को, ग्रासीम, हिरो मोटीकोर्प, एलआयसी, ओएनजीसी आणि बाटा इंडिया यांचे निकाल या आठवड्यात प्रामुख्याने जाहीर होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in