राहुल गांधी पुन्हा अमेठीतून लोकसभा लढणार ; यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांची घोषणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळाल्यापासून काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारलं आहे.
राहुल गांधी पुन्हा अमेठीतून लोकसभा लढणार ; यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांची घोषणा
Published on

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळाल्यापासून काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारलं आहे. त्यातचं आता राहुल गांधी यांच्या आगामी काळात लोकसभा निवडणूक लढवण्याविषयीच्या चर्चा सुरु झाल्या असताना आता त्याविषयी मोठी अपडेट आली आहे. राहुल गांधी हे पुन्हा त्यांच्या जुन्हा उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी केली आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अजय राय यांची उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांकडून राय यांच ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी प्रियंका गांधी म्हणतील त्या मतदार संघातून आम्ही राहूल गांधी यांना निवडणूक आणण्याचा प्रयत्न करू असं ते म्हणाले. यावेळी राय यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला. कमळाचं बटण दाबा, तुम्हाला १३ रुपये किलोने साखर मिळेल. असं स्मृती इराणी अमेठीच्या लोकांना म्हणाल्या होत्या. मात्र, ती अजूनही मिळाली नाही, असं राय म्हणाले.

बेरोजगारीस, महागाई आणि लोकांना घाबरवून आपल्यासोबत घेणे या राज्यातील सर्वात मोठ्या समस्या आहेत. लोकांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून आपल्या बाजून वातावरण निर्मीतीचं काम करत असल्याचं राय म्हणाले. तसंच राहुल गांधी यांनी काँग्रेस ते कन्याकुमारीपर्यंत जो प्रेमाचा संदेश दिलाय तो काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक घरात पोहचवतील, असं देखील ते म्हणाले.

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत, उत्तर प्रदेशातील अमेठी मतदार संघातून भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा मोठा पराभव केला होता. मात्र, राहुल यांनी वायनाडमधून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याठिकाणी राहुल यांचा मोठा विजय झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in