
रजत पाटीदारने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावत एका विशेष यादीत आपले नाव समाविष्ट केले. एका हंगामात प्ले ऑफमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्यांच्या यादीत रजत पाटीदार दुसऱ्या स्थानावर पोहोचला. या यादीत डेव्हिड वॉर्नर १९० धावा करून अव्वल स्थानावर आहे. त्याने २०१६च्या आयपीएल हंगामात या धावा केल्या होत्या.
त्यानंतर रजत पाटीदारचा नंबर लागतो. त्याने यंदाच्या हंगामात १७० धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मुरली विजयचा नंबर लागतो. त्याने २०१२च्या आयपीएल हंगामात १५६ धावा केल्या होत्या. २०१४ मध्ये वृद्धिमान साहाने १५६ धावा केल्या होत्या. तो यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.