काँग्रेसकडून राम आणि शक्तीचा अवमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम होऊ नये यासाठी काँग्रेसने अनेकदा प्रयत्न केले, मात्र देशातील जनतेने देणगी देऊन इतके सुंदर मंदिर उभारले, जनतेने तुमच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष करून प्राणप्रतिष्ठा समारंभाला निमंत्रित केले तेव्हा तुम्ही ते निमंत्रण अव्हेरले आणि रामचंद्रांचा अपमान केला, जे नेते या समारंभाला हजर राहिले त्यांची तुम्ही पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली, असेही पंतप्रधान म्हणाले.
काँग्रेसकडून राम आणि शक्तीचा अवमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

पिलिभीत : आम्ही अयोध्या येथील श्री राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाचे काँग्रेसला निमंत्रण दिले होते. पण काँग्रेसने ते निमंत्रण अव्हेरून प्रभू श्रीरामाचा अवमान केला आहे. तसेच देश ज्या शक्तीसमोर नतमस्तक होतो, तिला देशातून उखडून टाकण्याची भाषा करून काँग्रेसने शक्तीचाही अपमान केला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामात अडथळे आणण्याचा काँग्रेसने अनेकदा प्रयत्न केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मंगळवारी उत्तर प्रदेशातील पिलिभित येथे आयोजित निवडणूक प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

लांगूलचालनाच्या दलदलीत काँग्रेसचे विसर्जन झाले असून त्यामधून तो पक्ष कधीही बाहेर येऊ शकत नाही, असेही मोदी यांनी येथे एका निवडणूक जाहीर सभेत सांगितले. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम होऊ नये यासाठी काँग्रेसने अनेकदा प्रयत्न केले, मात्र देशातील जनतेने देणगी देऊन इतके सुंदर मंदिर उभारले, जनतेने तुमच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष करून प्राणप्रतिष्ठा समारंभाला निमंत्रित केले तेव्हा तुम्ही ते निमंत्रण अव्हेरले आणि रामचंद्रांचा अपमान केला, जे नेते या समारंभाला हजर राहिले त्यांची तुम्ही पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली, असेही पंतप्रधान म्हणाले.

देशातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या भक्तिभावानुसार आणि ऐपतीनुसार राम मंदिरासाठी देणगी दिली, पिलिभीतमधील जनतेनेही भेटवस्तू म्हणून मोठ्या आकाराची बासरी दिली, मात्र इंडिया आघाडीतील लोकांच्या मनात मंदिराचे बांधकाम होण्यापूर्वी आणि झाल्यानंतरही तिरस्कारच आहे, असेही मोदी म्हणाले. या वेळी मोदी यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचा उल्लेख केला. कल्याणसिंह यांनी आपले संपूर्ण जीवन आणि सरकारचा कारभार राम मंदिरासाठी समर्पित केला, असे ते म्हणाले. काँग्रेस लांगूलचालनाच्या दलदतील इतकी फसली आहे की ते आता त्यामधून बाहेरच येऊ शकत नाहीत, असेही मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in