वाचा कोणकोणत्या कंपन्यांचे बाजारमूल्य घसरले

कच्च्या तेलाचे वाढते दर आणि वाढती महागाई यामुळे गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा केला.
वाचा कोणकोणत्या कंपन्यांचे बाजारमूल्य घसरले

आघाडीच्या दहा कंपन्यांच्या बाजारमूल्यात गेल्या आठवड्यात २.२९ लाख कोटींची घसरण झाली. त्यात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनला जास्त फटका बसला. गेल्या आठवड्यात, बीएसई ३० शेअर्सचा सेन्सेक्स १,४६५.७९ अंकांनी किंवा२.६२ टक्क्यांनी घसरला. तर निफ्टी ३८२.५० अंक किंवा २.३१ टक्के घसरला. कच्च्या तेलाचे वाढते दर आणि वाढती महागाई यामुळे गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा केला.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य ४४,३११ कोटींनी घसरुन १८,३६,०३९.२८ कोटी रु. झाले. टीसीएस आणि इन्फोसिसचे बाजारमूल्य ४५,७४६ कोटींनी घसरले. त्यामुळे टीसीएसचे मूल्य १२,३१,३९८.८५ कोटी तर इन्फोसिसचे ६,२१,५०२.६३ कोटी झाले. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयच्या बाजारमूल्यातही ३४,९७०.२६ कोटींनी घट झाली. एचडीएफसी बँकेचे मूल्य १६,४३३.९२ कोटींनी घटून ७,४९,८८०.७९ कोटी तर एसबीआयचे २,२३१.१५ कोटींनी घसरुन ४,१२,१३८.५६ कोटी तर आयसीआयसीआय बँकेचे १६,३०५.१९ कोटींनी घटून ५,००,७४४.२७ कोटी झाले. हिंदुस्तान युनिलिव्हर लि.च्या मूल्यात २१,६७४.९८ कोटींनी घसरुन ५,१६,८८६.५८ कोटी तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी)चे ५७,२७२.८५ कोटींनी कमी होऊन ४,४८,८८५.०९ कोटी रु. झाले. तसेच एचडीएफसीचे मूल्य १७,८७९.२२ कोटींनी घसरुन ३,९५,४२०.१४ कोटी झाले. तसेच भारती एअरटेलचे ७,३५९.३१ कोटींनी घटून ३,६९,६१३.४४ कोटी झाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in