नवी दिल्ली : मालदीवमधील लष्करी तळ उठवण्याची अधिकृत मागणी तेथील नवीन प्रशासनाने भारताकडे केली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नुकतीच डॉ. मोहम्मद मुईझू यांची भेट घेतली. त्यावेळी मुईझू यांनी भारताकडे सैन्य मागे घेण्यासाठी अधिकृत विनंती केली.
हिंदी महासागर क्षेत्रात मालदीव बेटांचे भू-राजकीय महत्त्व मोठे आहे. चीन आणि अन्य देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तेथील तलाचा भारताला उपयोग होत होता. मात्र, मालदीवमध्ये नव्याने निवडून आलेले अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुईझु यांनी भारताला तेथून लष्कर हटवण्याची विनंती केली आहे.
मालदीवमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डॉ. मोहम्मद मुईझू हे अध्यक्षपदासाठी निवडून आले. त्यांनी सध्याचे अध्यक्ष ईब्राहीम सोलीह यांचा पराभव केला. सोलीह यांची धोरणे भारताच्या बाजूची होती. पण, मुईझू यांनी निवडणूक प्रचारातच जाहीर केले होते की, ते निवडून आल्यास भारताला देशातून सैन्य मागे घेण्यास सांगतील. अर्थात, त्यासाठी त्यांनी वाटाघाटींचा मार्ग अवलंबला आहे.