डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी सुरुच; १३ पैशांची झाली घसरण

इंटरबँक फॉरेन एक्सचेंज बाजारात स्थानिक चलन बुधवारी सकाळी ७९.९१ वर उघडले
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी सुरुच; १३ पैशांची झाली घसरण

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी १३ पैशांनी घसरल्याने पुन्हा ८०ची पातळी ओलांडली. आयातदारांकडून डॉलरची जोरदार मागणी झाल्याने क्रूड तेलाचे भाव जास्त असल्याच्या परिणामी रुपयाची घसरगुंडी सुरु आहे.

इंटरबँक फॉरेन एक्सचेंज बाजारात स्थानिक चलन बुधवारी सकाळी ७९.९१ वर उघडले आणि डॉलरच्या तुलनेत नंतर ते ८०.०५ पर्यंत घसरले. रुपया ७९.८९ ते ८०.०५ च्या दरम्यान दिवसभरात व्यवहार करत होता. मात्र, व्यवहाराच्या अखेरीस तो ८०.०५ या नीचांकी पातळीवर बंद झाला. त्यामुळे मंगळवारच्या तुलनेत रुपयामध्ये १३ पैशांनी घसरण झाली. मंगळवारी सकाळच्या व्यवहारात रुपयाने डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच सार्वकालिक ८०.०५ रुपये प्रति डॉलर नीचांकी पातळी गाठली होती. मात्र, दिवसअखेरीस सहा पैशांनी मजबूत होऊन डॉलरचा नवा भाव ७९.९२ झाला होता. भारतीय शेअर बाजारात झालेली वाढ झाल्याने सकारात्मक फायदा रुपयाला बळ मिळण्यात झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in