देशातील एमएसएमईसाठी एकच जीएसटी दर आवश्यक कँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे मत

सरकार मोठया उद्योगाचे समर्थन करत आहे.
देशातील एमएसएमईसाठी एकच जीएसटी दर आवश्यक कँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे मत

वायनाड : देशातील एमएसएमई क्षेत्राला वाचवण्यासाठी, देशाला औद्योगिक केंद्र बनवण्यासाठी एकच जीएसटी दर आवश्यक आहे, असे मत कँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

वायनाड या मतदारसंघात राहुल गांधी गेले होते. त्याचवेळी रस्त्यात उटी येथील चॉकलेट बनवण्याच्या फॅक्ट्रीला त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की एसएसएमई क्षेत्रात देशाच्या विकासाचे इंजिन चालवण्याची ताकद आहे. देशातील एमएसएमई क्षेत्र जीएसटी कराने झुंजत आहे. सरकार मोठया उद्योगाचे समर्थन करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in