घाऊक महागाईदरात घसरणीने सेन्सेक्सची ३७९ अंकांनी उसळी; निफ्टी मध्येही झाली वाढ

३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३७९.४३ किंवा ०.६४ टक्का वधारुन ५९,८४२.२१वर बंद झाला.
घाऊक महागाईदरात घसरणीने सेन्सेक्सची ३७९ अंकांनी उसळी;  निफ्टी मध्येही झाली वाढ

घाऊक महागाईत किचिंत दिलासा मिळाल्याने भारतीय शेअर बाजारात उत्साही वातावरण होते. मंगळवारी सेन्सेक्स ३७९ अंकांनी उसळला तर निफ्टीही १७,८००वर गेला. तेल आणि वायू, बँका आणि वाहन कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी राहिली आहे.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३७९.४३ किंवा ०.६४ टक्का वधारुन ५९,८४२.२१वर बंद झाला. दिवसभरात तो ४६०.२५ अंकांनी वाढून ५९,९२३.०३ची कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी वाढ झाली. निफ्टी १२७.१० अंक किंवा ०.७२ टक्का वाढून १७,८२५.२५वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत महिंद्रा ॲण्ड महिंद्राचा समभाग नवी पाच इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याची घोषणा झाल्याने सर्वाधिक २.२८ टक्के वाढला. तर मारुतीचा समभाग २.१९ टक्के, एशियन पेंटस‌्चा २.०९ टक्के आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचा १.९ टक्के वधारला. तर एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागातही वाढ झाली. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा समभाग ०.९ टक्का घसरला. भारती एअरटेल, बजाज फायनान्स, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस आणि एनटीपीसीच्या समभागात घट झाली.

आशियाई बाजारात सेऊल, शांघायमध्ये वाढ तर टोकियोमध्ये घसरण झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत वाढ जाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.८६ टक्का घटून प्रति बॅरलचा भाव ९४.२८ अमेरिकन डॉलर्स झाला. पारशी दिनानिमित्त फॉरेक्स आणि मनी मार्केट बंद होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in