
शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरे? यावर सर्वोच्च न्यायालय घटनापीठ स्थापन करण्याचा विचार करत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कुणाचे? याप्रकरणी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सुनावणीसाठी नोटीस बजावली आहे. आयोगाने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला ८ ऑगस्टपर्यंत या दाव्याबाबतची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.
पक्षातील वादावर निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना त्यांचे लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर निर्माण झालेल्या शिवसेनेतील पेचप्रसंगावर दोन्ही गटांनी वेगवेगळे दावे केले आहेत. शिंदे गटाला पक्षाच्या ५५ पैकी ४० आमदार आणि १९ लोकसभा खासदारांपैकी १२ सदस्यांचा पाठिंबा आहे. त्याच वेळी ठाकरे गटाने पक्षाच्या कार्यकारिणीतून आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९७६ मध्ये शिवसेनेची राज्यघटना तयार केली. या घटनेनुसार सर्वोच्च पद म्हणजेच ‘शिवसेनाप्रमुख’ झाल्यानंतर १३ सदस्यांची कार्यकारिणी पक्षाबाबत कोणताही निर्णय घेऊ शकते, असे घोषित करण्यात आले होते. राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरे, मनोहर जोशी,