जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सिद्धीने रौप्यपदक तर रिद्धीने कांस्यपदक पटकावले

जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सिद्धीने रौप्यपदक तर रिद्धीने कांस्यपदक पटकावले

खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महिला गटात सिद्धी हत्तेकरने टेबल व्हॉल्ट या प्रकारात रौप्यपदक जिंकले, तर वैयक्तिक सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्ट या स्पर्धा प्रकारात तिची बहीण रिद्धी हत्तेकरने कांस्यपदक मिळविले.

मागील तीनही खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये रिद्धी आणि सिद्धी भगिनींनी पथकांची मालिका निर्माण केली व ती याही स्पर्धेमध्ये टिकविली. औरंगाबाद येथील एनसीओई साई पश्चिम विभागीय केंद्रात या दोन्ही भगिनी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. त्यांना पिंकी देवनाथ व संजय मोरे यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. पुरुष गटात मनेश गाढवेने कांस्यपदक मिळवत पुरुषांमध्येही पथकाचे खाते उघडले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in