गंगटोक : सिक्किममध्ये ढगफुटीनंतर तिस्टा नदीला अचानक आलेल्या पुरात मृत झालेल्यांची संख्या आता ४० वर पोहोचली असून ७६ जण अजूनही बेपत्ता आहेत. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
ढगफुटी झाल्यानंतर अचानक आलेल्या पुरामुळे सिक्कीम मधील तब्बल ८८ हजार लोकांना झळ बसली आहे. ४ ऑक्टोबरच्या पहाटे आलेल्या या पुराचा फटका जवळजवळ संपूर्ण राज्याला बसला आहे. २०११ सालच्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या सुमारे ६.१० लाख आहे. पुरात वाहून मृतांची शरिरे बहुतांश पाकयॉंग या ठिकाणी सापडली. एकूण २६ मृतदेह या जिल्ह्यात सापडले असून त्यापैकी १५ सामान्य नागरीक तर ११ लष्करी जवान होते. चार शव मंगन या ठिकाणी सापडले तर ८ शव गंगटोक येथे आणि २ शव निमचिक येथे सापडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तर अनेक शव शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये सापडली आहेत. ही सर्व शव तीस्ता नदीतून वाहून आले होते. आता तेथे २० मदत शिबीर सुरु असून त्यात एकूण २०८० जण असल्याची माहिती बचाव यंत्रणांकडून मिळाली आहे.