सिल्क्यरा बोगदा दुर्घटना : बचावकार्य थांबवले मशीनमध्ये बिघाड झाल्याने काम ठप्प : मजुरांचे नातेवाईक अस्वस्थ

इंदूर येथून आणखी एक उच्च कार्यक्षमतेचे यंत्र आणले असून ते वापरले जाणार आहे. त्यापूर्वी त्याचे तीन भाग तेथे जुळवले जाणार आहेत.
सिल्क्यरा बोगदा दुर्घटना : बचावकार्य थांबवले 
मशीनमध्ये बिघाड झाल्याने काम ठप्प : मजुरांचे नातेवाईक अस्वस्थ

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगदा कोसळून आतमध्ये अडकून पडलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी अमेरिकी बनावटीचे यंत्रही आणून काम मदतीचे सुरू करण्यात आले होते. त्यामुळे बोगद्यातील कोसळलेल्या ढिगारा ड्रिल करून त्यात पाईप सरकावून मार्ग करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, यंत्रामध्ये काही बिघाड झाल्याने काम अंशत: बंद झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता इंदूर येथून आणखी एक उच्च कार्यक्षमतेचे यंत्र आणले असून ते वापरले जाणार आहे. त्यापूर्वी त्याचे तीन भाग तेथे जुळवले जाणार आहेत.

दरम्यान, आत अडकलेल्या कामगारांची संख्या ४१ असल्याचे सांगण्यात आले आहे. बोगद्याचे काम एनएचआयडीसीएल करीत असून नवयूग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडला त्या कामाचे कंत्राट दिले आहे. अतिरिक्त सचिव, एमओआरटीएच महमूद अहमद, पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव, मंगेश घिलडियाल, वरुण अधिकारी, भूगर्भशास्त्रज्ञ अभियांत्रिकी आणि अभियांत्रिकी तज्ञ अरमांडो कॅपेलन यांच्यासह केंद्रातील अधिकाऱ्यांचे पथक बचावकार्याचा जागेवरच आढावा घेण्यासाठी सिल्क्यरा येथे पोहोचले आहे.

शुक्रवारी दुपारी येथील मदतकाम थांबले तोपर्यंत, हेवी-ड्यूटी ऑगर मशीनने बोगद्याच्या आत ६० मीटर परिसरात पसरलेल्या ढिगाऱ्यातून २४ मीटरपर्यंत ड्रिल केले होते. शुक्रवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास, पाचव्या पाईपच्या स्थितीदरम्यान, बोगद्यात मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर बचाव कार्य स्थगित करण्यात आले, असे एनएचआयडीसीएलने शुक्रवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आणखी काही भाग कोसळण्याचा धोका

आवाजाने बचाव पथकात घबराट निर्माण झाली. या प्रकल्पाशी निगडित असलेल्या एका तज्ज्ञाने परिसरात आणखी काही भाग कोसळण्याची शक्यता वर्तविल्यानंतर पाईप आत ढकलण्याची क्रिया थांबवण्यात आली. मात्र, बोगद्यातील बचावकार्य सातव्या दिवसात दाखल झाल्याने अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांची अस्वस्थता वाढली असून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in