प. बंगालमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांच्या साहित्यात आता स्नेक रिपेलंट

कर्मचाऱ्यांना सर्पदंशाचा धोका टळू शकतो
प. बंगालमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांच्या साहित्यात आता स्नेक रिपेलंट

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांना सरकारकडून आता अन्य साहित्यासह स्नेक रिपेलंटही देण्यात येणार आहे.

राज्यात ८ जुलै रोजी पंचायत निवडणुका होत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात साप मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून फिरत असतात. त्यामुळे जून ते ऑगस्ट दरम्यान सर्पदंशांचे प्रमाणही वाढलेले असते. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कर्मचाऱ्यांच्या साहित्यात अन्य गरजेच्या वस्तूंबरोबर कार्बोलिक आम्ल हे स्नेक रिपेलंट म्हणजे सापांना दूर पळवणारे रसायन दिले आहे. त्याचा वास अत्यंत उग्र असतो आणि थोडे जरी रसायन सापाच्या मार्गात टाकले तर साप आपला मार्ग बदलून बाजूला जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सर्पदंशाचा धोका टळू शकतो.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि केरळ या राज्यांत सर्पदंशांचे प्रमाण मोठे आहे. प. बंगालमध्ये नाग, रसेल्स व्हायपर, कॉमन क्रेट अशा सापांचे प्रमाण मोठे आहे. पावसाळ्यात साप बाहेर पडतात आणि २५ टक्के सर्पदंश प्राणघातक ठरतात. तेव्हा निवडणूक कर्माचाऱ्यांसाठी कार्बोलिक आम्ल जीवदान देणारे ठरू शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in