
अरुण कुमार सिन्हा यांचं बुधवारी (६ सप्टेंबर) गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये वयाच्या 60 व्या वर्षी निधन झालं आहे. ते स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG)चे संचालक होते. सिन्हा हे गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी झुंज देत होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे होती. अरुण कुमार सिन्हा यांनी २०१६ मध्ये एसपीजी संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. ते १९९७ केरळ केडरचे आयपीएस अधिकारी होते आणि पंतप्रधानांच्या सुरक्षा शाखेचे प्रभारी होते.
विशेष संरक्षण गटाकडे (SPG) भारताचे पंतप्रधान आणि माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याचं काम होतं. या वर्षी ३० मे रोजी त्यांच्या निवृत्तीच्या एक दिवस आधी, ACC ने सिन्हा यांना एक वर्षाची मुदतवाढ मंजूर केली होती.
सिन्हा यांनी आपल्या करियरमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. ते केरळचे डीसीपी कमिश्नर, इंटेलिजन्स आयजी आणि तिरुवनंतपुरममध्ये प्रशासन आयजी देखील होते. मालदीव येथे राष्ट्रपती अब्दुल गयूम यांच्या हत्या प्रकरणाची उकल केल्यामुळे त्यांना ओळख मिळाली होती. त्यांनी या प्रकरणातील हत्येच्या आरोपींना दिल्लीतून पकडलं होतं. तेव्हा सिन्हा केरळमध्ये तैनात होते. सिन्हा यांना अनेक पुरस्कार आणि पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे .