राजकीय पक्ष, घटनातज्ज्ञांकडून सूचना मागवल्या ;एक देश, एक निवडणुकीसाठीच्या समितीची पहिली बैठक संपन्न

महिला आरक्षण निधेयक संमत करून अधिवेशनाचे सूप वाजल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला
राजकीय पक्ष, घटनातज्ज्ञांकडून सूचना मागवल्या ;एक देश, एक निवडणुकीसाठीच्या समितीची पहिली बैठक संपन्न

नवी दिल्ली : देशात एक देश, एक निवडणूक घेण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीची शनिवारी पहिली बैठक झाली. यात सर्व राष्ट्रीय, राज्यांतील सत्ताधारी प्रादेशिक पक्ष तसेच घटनातज्ज्ञांच्या सूचना, मते घेण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल की नाही, याचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच ही समिती स्थापन केली आहे.

केंद्रीय कायदा मंत्रालयाने २ सप्टेंबर रोजी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यावरही ही समिती अभ्यास करत आहे. राज्यघटनेतील दुरुस्त्यांना राज्यांकडून मान्यता आवश्यक आहे की नाही, हे देखील तपासले जाणार आहे. ही समिती निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास, सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यास किंवा पक्षांतर किंवा एकाचवेळी मतदान झाल्यास काय निर्णय घ्यायचा, या संभाव्य प्रश्नांवरील उपायांचे विश्लेषण आणि शिफारस करेल. संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाच्या तोंडावर ही समिती स्थापन झाल्याने विशेष अधिवेशनात याबाबतचे विधेयक येईल, अशी अटकळ लावली जात होती, पण महिला आरक्षण निधेयक संमत करून अधिवेशनाचे सूप वाजल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in