महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे राहणार; पुढील सुनावणी 'या' तारखांना

ठाकरे गटाने केलेल्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; या तारखांना होणार पुढची सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे राहणार; पुढील सुनावणी 'या' तारखांना

आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा महत्त्वाचा दिवस आहे. याआधी ठाकरे गटाने हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी नाकारली असून हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे राहणार असून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. तसेच, पुढील सुनावणी ही २१ आणि २२ फेब्रुवारीला होणार आहे.

महाराष्ट्र सत्तासंघर्षाचे हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे रहाणार असल्याने निकाल तुलनेने लवकर लागणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करावे, अशी विनंती घटनापीठाकडे केली होती. या प्रकरणावर गेले ३ दिवस सलग सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आज निर्णय सुनावला. ठाकरे गटाची मागणी नाकारत सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक पानी निकालाचे वाचन केले. यामध्ये नबाम रेबीया प्रकरणाच्या गुणवत्तेवर चर्चा करण्यात आल्यानंतर हे प्रकरण ७ न्यायाधीशांकडे जाण्यासाठी पात्र नाही, त्यामुळे हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठकडे राहणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in