चालू बसमध्ये ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला आणि...

या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
चालू बसमध्ये ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला आणि...
Admin

गुजरातमधील नवसारी येथे आज सकाळी एक मोठी आणि भीषण दुर्घटना घडली. बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन या अपघातात 9 जण जागीच ठार झाले. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर वेस्मा गावाजवळ हा अपघात झाला. बस चालवत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट कारला धडकली. त्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कार आणि बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच अपघातातील सर्व नऊ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे दोन्ही वाहनांमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी वाहनांचे पत्रे कापावे लागले. त्यामुळे जखमींना मदत करण्यास वेळ लागला.

या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासी प्रचंड नाराज झाले आहेत. पोलिसांनी जखमींना आणि मृतदेहांना रुग्णालयात पाठवले आहे. सध्या बस आणि कार रस्त्यावरून हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in