भारतीय शेअर बाजारात कंपन्यांच्या बाजारमूल्यात कोटींची घट

बीएसई सेन्सेक्स २,९४३.०२ अंक किंवा ५.४२ टक्के तर एनएसई निफ्टी ९०८.३० अंक किंवा ५.६१ टक्के घसरला.
भारतीय शेअर बाजारात कंपन्यांच्या  बाजारमूल्यात कोटींची घट

विक्रीचा मारा होत असल्याने भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात आघाडीच्या दहा कंपन्यांच्या बाजारमूल्यात ३.९१ लाख कोटींची - ३,९१,६२०.०१ कोटींची घट झाली आहे. टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांना सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स २,९४३.०२ अंक किंवा ५.४२ टक्के तर एनएसई निफ्टी ९०८.३० अंक किंवा ५.६१ टक्के घसरला.

टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (टीसीएस)ला सर्वाधिक १,०१,०२६.४ कोटी रुपयांचे नुकसान होऊन कंपनीचे बाजारमूल्य ११,३०,३७२.४५ कोटी झाले. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य ८४,३५२.७६ कोटींनी घटून १७,५१,६८६.५२ कोटी झाले. इन्फोसिसचे मूल्य ३७,६५६.६२ कोटींनी घसरुन ५,८३,८४६.०१ कोटी, एलआयसीचे ३४,७८७.४९ कोटींनी घटून ४,१४,०९७.६० कोटी झाले.

एचडीएफसी बँकेचे मूल्य ३३,५०७.६६ कोटींनी कमी होऊन ७,१६,३७३ कोटी, एचडीएफसीचे २२,९७७.५१ कोटींनी घटून ३,७२,४४२.६३ कोटी, हिंदुस्तान युनिलिव्हरचे २०,५३५.४३ कोटींनी घसरुन ४,९६,३५१.१५ कोटी झाले.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) १८,५६३.१९ कोटींनी कमी होऊन ३,९३,५७५.३७ कोटी तर भारती एअरटेलचे १६,००९.२६ कोटींनी घटून ३,५३,६०४.१८ कोटी झाले.

आघाडीच्या दहा कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अव्वल स्थान कायम ठेवले असून त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एलआयसी, एसबीआय, एचडीएफसी आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in