उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराचे नाव जाहीर

या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराचे नाव जाहीर

भारतीय जनता पक्षाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनखड यांचे नाव जाहीर केले आहे. धनखड यांनी जुलै २०१९ मध्ये पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची सूत्र हाती घेतली होती. गेल्या तीन वर्षांच्या काळात धनखड आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात अनेक मुद्द्यांवरून संघर्ष उडाला होता. त्यांच्या या संघर्षाची दखल घेत भाजपच्या हायकमांडने त्यांना उपराष्ट्रपतीपदाचे तिकीट बहाल केले आहे.

भाजपच्या संसदीय मंडळाची शनिवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. त्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा केली. या ना त्या कारणांवरून त्यांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संघर्ष होत राहिला, तो देशात चर्चेचा विषय ठरायचा. आता त्याच धनखड यांना भाजपने उपराष्ट्रपतीपदाचे तिकीट दिले आहे. ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि त्याच दिवशी निकालही लागेल. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या ११ ऑगस्ट रोजी संपत आहे.

यापूर्वी मुख्तार अब्बास नक्वी, नजमा हेपतुल्ला आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची नावे उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत होती. मात्र, भाजपने बंगालच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाचे तिकीट दिले. यापूर्वी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in