पक्षी धडकल्याने विमानाला लागली आग,जीवितहानी नाही

स्पाईसजेटच्या बोईंग ७२७ विमानाला अचानकपणे आग लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे
पक्षी धडकल्याने विमानाला लागली आग,जीवितहानी नाही

स्पाईसजेट कंपनीच्या एका विमानाला अचानक आग लागल्यामुळे बोईंग ७२७ या विमानाचे बिहारमधील पाटणा येथील बिहता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. पक्षी धडकल्यामुळे विमानाला आग लागली आणि विमान जवळपास १० मिनिटे हवेतच घिरट्या घालत होते. विमानातील एकूण १८५ प्रवासी सुखरुप बाहेर आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र स्पाईसजेटच्या बोईंग ७२७ विमानाला अचानकपणे आग लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्पाईस जेटच्या बोईंग ७२७ या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानाला मागील डाव्या बाजुने अचानक आग लागली. आग लागल्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. रविवारी दुपारी ११.५५ वाजता विमानाने उड्डाण केले. त्यानंतर काही मिनिटांनी १२.२० वाजता विमानात स्फोट होऊन आग लागली. वैमानिकाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवून १० मिनिटांनंतर काळजीपूर्वक विमान विमानतळावर उतरवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in