रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरणात रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता

रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरणात रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता

महागाई कमी होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरणात रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसे झाल्यास सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. पर्यायाने कर्जचा हप्ता वाढणार असल्याने कर्जदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे.पुढील आठवड्याच्या आढाव्यात आरबीआय रेपो दरात०.४०टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. विदेशी ब्रोकरेज कंपनी बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, आरबीआयने गेल्या मे महिन्यातही रेपो दरात ०.४०टक्क्यांनी वाढ केली होती, त्यानंतर हा दर ४.४०टक्क्यांवर आणला होता. यामागे महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

महागाई ७ टक्के अपेक्षित

ब्रोकरेज कंपनीच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यातही महागाईचा आकडा ७ टक्के राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक आणखी पावले उचलू शकते. आरबीआय पुढील आठवड्यात रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ करू शकते. याशिवाय, ऑगस्टच्या आढाव्यातही ते ०.३५ टक्क्यानी वाढू शकते.

येत्या काही महिन्यांत आरबीआय पुन्हा एकदा ऑगस्टमध्ये व्याजदर ०.३५ टक्क्यावरून ०.५०टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. रेपो दर असाच वाढत राहिला तर येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांवर कर्जाच्या ईएमआयचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये किरकोळ महागाई दर सरासरी ६.८ टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे. महागाई नियंत्रणासाठी आरबीआयच्या प्रयत्नांचा परिणाम डाळी आणि तेलावर दिसून येत आहे. पण टोमॅटो आणि बटाट्याच्या किमती वाढल्या आहेत. टोमॅटोच्या दरामुळे मे महिन्यात पुन्हा महागाई वाढल्याचे सांगण्यात येत आहे. मूळ चलनवाढीचा दर ७.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आरबीआयचे व्याजदर वाढणे जवळपास निश्चित आहे. तथापि, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यासाठी, क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात शुल्कमुक्त करण्यासाठी आणि विमानाच्या इंधनाची किंमत कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात टोमॅटो ३१.६४ रुपये प्रति किलोवरून ५२.३२ रुपये किलो तर देशात काही ठिकाणी ७० रुपये किलो झाला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in