हरित संक्रमणाचा वापर ही उर्जा संक्रमणाची गुरुकिल्ली ; ऊर्जा मंत्री, आर.के. सिंह

हरित संक्रमणाचा वापर ही उर्जा संक्रमणाची गुरुकिल्ली ;  ऊर्जा मंत्री,  आर.के. सिंह

२००५ च्या तुलनेत २०३० पर्यंत उत्सर्जन तीव्रता ४५ टक्क्याने कमी करण्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंह यांनी केले.

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री, आर.के. सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना आणि नायब राज्यपालांना ऊर्जा संक्रमणासाठी राज्यस्तरीय सुकाणू समित्या स्थापन करण्यास सांगितले आहे.

ऊर्जा संक्रमण हे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर केलेल्या आमच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याचे एकमेव साधन आहे. आंध्र प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड सारख्या काही राज्यांनी अशा समित्या आधीच स्थापन केल्या आहेत, अशी माहिती सिंह यांनी दिली.

ऊर्जा संक्रमणासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अनेक मार्गांवर एकत्र काम करावे लागेल, हे अधोरेखित करून ते पुढे म्हणाले की, देशातील विजेची सतत वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी वीज निर्मितीला नवीकरणीय ऊर्जेची जोड देणे हा पहिला मार्ग आहे. ते म्हणाले की दुसरा मार्ग ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देईल तर तिसरा मार्ग बायोमास आणि हरित हायड्रोजनचा अधिक वापराचा असेल. ते म्हणाले की, या मुद्यांवर आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले तर आपण आपली उद्दिष्टे साध्य करू शकू. त्यासोबतच यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, विकासाला गती मिळेल आणि परिणामी देशातील प्रत्येक नागरिकाचा त्याचा लाभ होईल.

कृषी क्षेत्रातील डिझेलचा वापर मर्यादित करून २०२४ पर्यंत कृषी क्षेत्रात डिझेलचा वापर पूर्णपणे थांबवा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सिंह यांनी केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in