भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर देशातल्या प्रमुख कुस्तीपटूंनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. बृजभूषण यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी कुस्तीपडून गेल्या दीड महिने दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शांततेतच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंचं आंदोलन मोडून काढलं आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून कुस्तीपटूंना पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज हरियाणातील कुरुक्षेत्रात खाप महापंचातीचे आयोजन करण्यात आलं होतं. या महापंचायतीत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकरला अल्टिमेटम दिला आहे. 9 जून पर्यंत बृजभूषण सिंहला अटक केली नाही तर, त्यानंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशारा टिकैत यांनी दिला आहे.
आज झालेल्या महापंचायतीत टिकैत यांनी आम्ही बृजभूषण सिंहला अटक करण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगितलं. तसंच 9 जून रोजी आम्ही कुस्तीपटूंना पुन्हा जंतरमंतरवर सोडू आणि देशभर पंचायतींचं आयोजित करु, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या आधी गुरुवार (1 जून) रोजी उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, त्यात कोणताही प्रस्ताव मंजूर केला गेला नव्हता. या दोन्ही महापंचायतींना हरयाणा, पंजाब, दिल्ली आणि राजस्थानमधील खाप पंचायतींच्या प्रमुखांनी सहभाग नोंदवला होता.
शुक्रवार 2 जून रोजी झालेल्या महापंचायतीत राकेश टिकैत यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनात आम्हाला कोणताही मध्यममार्ग मंजूर नसून बृजभूषण सिंहच्या अटकेवर आम्ही ठाम आहोत, अशी भूमिका घेतली. कुस्तीपटूंना न्याय न मिळाल्यास 9 जून नंतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करु, असा इशारा देखील दिला आहे. तसंच शामली येथे 11 जून आणि हरिद्वार येथे 15 ते 18 जूनपर्यंत खाप पंचायत आयोजित करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
आंदोलक कुस्तीपटूंना टिकैत यांनी आधिपासून आपला पाठिंबा दर्शवला आहे. सरकारवर जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडत असल्याची टीका टिकैत यांनी केली आहे. तसंच खाप पंचायतींच्या दबामुळे अयोध्येतील रॅली बृजभूषण यांनी रद्द केली असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. येत्या काळात असाच दबाव कायम ठेवला पाहिजे, असं म्हणत बृजभूषणवर कारवाईची चिन्हे न दिसल्यास गावा-गावात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.