यमुनोत्री महामार्गावर बांधकामाखालील बोगदा अंशत: कोसळून ३६ कामगार अडकले मदतकार्य सुरू, ऑक्सिजन, खाद्यपदार्थही पाठविले

लवकरच या कामगारांना बाहेर काढण्यात येईल, असा विश्वास यदुवंशी यांनी व्यक्त केला
यमुनोत्री महामार्गावर बांधकामाखालील बोगदा अंशत: कोसळून ३६ कामगार अडकले मदतकार्य सुरू, ऑक्सिजन, खाद्यपदार्थही पाठविले

उत्तरकाशी (उत्तराखंड) - ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी सिल्कयारा आणि दांडलागाव दरम्यान बांधकाम सुरू असलेला एक भुयारीमार्ग कोसळून भुयारात ३६ कामगार अडकले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान मदतकार्य करीत असल्याची माहिती उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी दिली.

रविवारी सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या संबंधातील उपलब्ध माहिती व तपशिलांनुसार नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या (एनएचआयडीसीएल) अधिकाऱ्यांनी या भुयारात आतमध्ये ३६ कामगार अडकून पडले असल्याची माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार ही संख्या ४० होती.

भुयारमार्गाचा कोसळलेला भाग प्रवेशद्वारापासून २०० मीटर आत असून आतील स्थिती लक्षात घेता अडकलेल्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून ऑक्सिजन पाइपात टाकले आहेत. तसेच अन्नपदार्थ, पाणीही पाठविण्यात आले आहे. लवकरच या कामगारांना बाहेर काढण्यात येईल, असा विश्वास यदुवंशी यांनी व्यक्त केला. हा बोगदा चार धाम सर्व-हवामानासाठीच्या रस्ता प्रकल्पाचा भाग आहे. त्याच्या बांधकामामुळे उत्तरकाशी ते यमुनोत्री दरम्यानचा प्रवास २६ किमीने कमी होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in