
क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohali) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) उज्जैनला पोहोचले आहेत. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बाबा नीम करौलीच्या दर्शनासाठी गेलेले विराट-अनुष्का आता महाकालेश्वरला पोहोचले आहेत. 'एएनआय'ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात अनुष्का आणि विराट दोघेही दिसत आहेत. अनुष्काने साडी नेसली असून डोक्यावर पदर घेऊन पूजा करताना दिसत आहे. तर, विराटही धोतर घातलेला, कपाळावर चंदनाचा माळा आणि गळ्यात रुद्राक्षाचा हार घातलेला दिसत आहे. दोघांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रसंगी अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणाली, “आम्ही येथे प्रार्थना करण्यासाठी आणि महाकालेश्वर मंदिरात चांगले दर्शन झाले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीची कामगिरी फारशी चांगली झाली नाही, त्याची बॅट अजूनही शांत आहे. इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत विराटकडून मोठा खेळ अपेक्षित होता. मात्र, तो येथेही खेळू शकला नाही.