
पश्चिम बंगालच्या(West Bengal) उत्तर २४ परगणा येथील दत्तपुकरु भागातील फटाक्यांच्या कारख्यान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून आजूबाच्या अनेक घरांचं नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, स्थानिक रहिवाश्यांनी केलेल्या दाव्यानुसार या घटनेत किमान ६ ते ७ जण ठार झाले आहेत.
एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगलच्या दत्तपुकुरमधील बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोट झाल्यानंतर या ठिकाणी ताक्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं. या स्फोटात जखमी झालेल्यांना उपचारासाठी बारासात रुग्णालयात नेण्यात आलं असल्याची माहिती दत्तपुकुर पोलीस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
या पूर्वी देखील मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एगरा येते बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. या घटनेत ९ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले होते. एगरा हा भाग ओडिशाच्या सीमेजवळ आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक देखील करण्यात आली होती.
यानंतर या घटनेतील मुख्य आरोपीचा ओडिशातील कटक रुग्णालयात मृत्यू झाला. स्पोट झाला त्यावेळी हा आरोपी त्याठिकाणी झाल्याने तो ८० टक्के भाजला होता. पोलीस त्याला अटक करण्यासाठी कटकला पोहचल्यावर त्याचा रुग्णालयातच उपचारातदरम्यान मृत्यू झाल्याचं समजलं होतं.