घाऊक महागाईने दिला पुन्हा एकदा मोठा धक्का

रासायनिक उत्पादने आणि अन्नधान्यापासूनची उत्पादने यांच्या दरात वाढ झाल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवदेनात म्हटले
घाऊक महागाईने दिला पुन्हा एकदा मोठा धक्का

एकीकडे देशातील जनतेला मेमधील किरकोळ महागाईत दिलासा मिळाला असतानाच घाऊक महागाईने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. मे महिन्यात घाऊक महागाई दराने पुन्हा १५ टक्क्यांच्या वरची पातळी कायम ठेवली आणि तो १५.८८ टक्क्यांवर पोहोचला. एप्रिल महिन्यात ते १५.०८ टक्के होता. खनिजत तेल, क्रूड पेट्रोलियम आणि नैसर्गिकवायू, अन्नधान्य, बेसिक धातू, बिगर अन्नधान्य वस्तू, रसायने आणि रासायनिक उत्पादने आणि अन्नधान्यापासूनची उत्पादने यांच्या दरात वाढ झाल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवदेनात म्हटले आहे.

सलग १४व्या महिन्यात दुहेरी अंक

घाऊक महागाईचा नवा विक्रमी स्तर गाठण्यात सगळ्यात मोठा हात आहे तो अन्नधान्यापासून विविध वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीचा. गेल्या वर्षी वरील महिन्यात घाऊक महागाई दर १३.११ टक्के होता. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी एप्रिलपासून सलग १४ व्या महिन्यात घाऊक महागाईचा दर दुहेरी अंकात राहिला आहे. घाऊक महागाईचा हा नवा उच्चांक गेल्या नऊ वर्षांतील सर्वोच्च आहे. दुसरीकडे, जुन्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, एप्रिलमध्ये आलेली महागाईची आकडेवारी गेल्या ३० वर्षांतील एप्रिल महिन्यात सर्वाधिक आहे.

खाद्यपदार्थ स्वस्त झाल्यामुळे मे महिन्यात किरकोळ महागाई ७.०४ टक्क्यांवर आली आहे. मात्र, गेल्या सलग पाच महिन्यांपासून ते आरबीआयच्या समाधानकारक पातळीपेक्षा वरच राहिले आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (एनएसओ) ने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित (सीपीआय) महागाई दर ७.७९ टक्के होता. गेल्या वर्षी मे महिन्यात किरकोळ महागाई दर ६.३ टक्के होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in