खारघर मधील भूखंडावर दैनंदिन बाजार विकसित करणार

खारघर मधील भूखंडावर दैनंदिन बाजार विकसित करणार

महिला व बालकल्याण सभापती हर्षदा अमर उपाध्याय यांच्या एक वर्षाच्या पाठपुराव्याला यश येऊन खारघरमध्ये दैनंदिन बाजार विकसित करण्याला मंगळवारच्या महासभेत मंजूरी देण्यात आली.

पनवेल पालिकेकडे सिडकोमार्फत हस्तांतर झालेले खारघर, सेक्टर १२ मधील भूखंडावर दैनंदिन बाजार विकसित करण्याच्या प्रस्तावास मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. लवकरच येथे सुसज्ज दैनंदिन बाजार उभारून ४३ फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. या भूखंडाशेजारी जुने खारघर पोलीस स्टेशन असल्यापासून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांनी या भूखंडाची ७० टक्के जागा व्यापली गेली होती व ३० टक्के जागा उपलब्ध होती. तेथे पंधरा वर्षांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. खारघरचे तत्कालीन वरिष्ठ पाेलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व आमदार प्रशांत ठाकूर तसेच सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सहकार्यामुळे या भूखंडावरील वाहने नवीन खारघर पोलीस चौकी समोर स्थलांतरित करण्यात आली हाेती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in