माणगाव नगरपंचायत हद्दीत स्वच्छता अभियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

या अभियाअंतर्गत माणगांव नगरपंचायत हद्दीत येणाऱ्या कचेरी रोड, महेंद्र ज्वेलर्स ते वाकडई देवी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
माणगाव नगरपंचायत हद्दीत स्वच्छता अभियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाचं आयोजन करुन शहरांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहीजे. शहरांमध्ये फक्त सुशोभिकरणच नाही तर सातत्याने स्वच्छताही आवश्यक असल्याने प्रशासनाने शहरांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवन्याचा ध्यास घेण्यात आला. त्यापैकी एक असलेल्या माणगांव नगरपंचायतीच्या हद्दीतही शुक्रवारी ( ४ऑगस्ट)स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आलं.

या अभियाअंतर्गत माणगांव नगरपंचायत हद्दीत येणाऱ्या कचेरी रोड, महेंद्र ज्वेलर्स ते वाकडई देवी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. माणगांवचे उप विभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांच्या मार्गदर्शनात तसंच तहसिलदार विकास गारूडकर व नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या नेतृत्वात हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यावेळी अपर तहसीलदार विनायक घुमरे, तालुका कृषी अधिकारी अजय वगरे, वनक्षेत्रपाल अनिरुद्ध ढगे, नगरपंचायतीचे स्वच्छता व आरोग्य सभापती दिनेश रातवडकर या मान्यवरांची मुख्य उपस्थितीत होती. त्याच बरोबर या अभियानात नगर पंचायतीचे कर्मचारी, सफाई कामगार, माणगांवमधील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, साबळे विद्यालयाचे मुख्याध्यापक धनाजी जाधव, श्रध्दा इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापक बिजांक्षी राय, पत्रकार रविंद्र कुवेसकर, महसुल, वन, कृषी विभाग अधिकारी आणि कर्मचारीवर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचं दिसून आलं.

यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या नियोजनानुसार प्रत्येकास विभागुण दिलेल्या टप्प्यातील प्लास्टिक, कचरा, गवत अनावश्यक झाडी-झुडपांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी स्वच्छता अभियानात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला मास्क, हँण्डग्लोव्हज, सराटा, फावडी, कोयती आदी साहित्य देण्यात आलं होतं. सकाळी सहा वाजता स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. जवळपास पाच तास ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नगर पंचायतीच्या वतिने अभियानात उपस्थितीत प्रत्येकासाठी पिण्याचं पाणी, चहा आणि अल्पोहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

हे स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माणगाव नगरपंचायतीचे शहर समन्वयक अतुल जाधव, कनिष्ठ अभियंता आकाश बुवा, कार्यालयीन कर्मचारी रामदास पवार, मंगेश पाटील यांनी जीवतोड मेहनत घेतली. याच दिवशी पोलिस परेड मैदान, लाईन व प्रांत कार्यालय परिसरात नगर पंचायत टीमकडून सायंकाळपर्यंत स्वच्छता मोहीम राबण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in