अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणााऱ्याला केली अटक

या घटनेतील २५ वर्षीय विवाहिता खारघमध्ये आपल्या कुटुंबीयासह राहण्यास आहे.
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणााऱ्याला केली अटक

सोशल मिडीयावर अश्लील फोटो व्हायरल करण्याची भिती दाखवून खारघरमधील विवाहितेकडून १२ लाख ५८ रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम उकळणाऱ्या तसेच सदर विवाहितेला धमकावून तिच्याकडून आणखी रोख रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका खंडणीखोराला खारघर पोलिसांनी हिमाचल प्रदेशमधून अटक केली आहे. नविन श्यामदेव कश्यप असे या खंडणीखोराचे नाव असून मागील काही महिन्यापासून हा आरोपी सदर विवाहितेला त्रास देत होता.

या घटनेतील २५ वर्षीय विवाहिता खारघमध्ये आपल्या कुटुंबीयासह राहण्यास आहे. विवाहितेची मिनाक्षी नामक महिलेसोबत इन्स्टाग्रामवरुन ओळख झाली होती. मिनाक्षीचे मित्र सचिन आणि नवीन दोघांनी सदर विवाहितेसोबत मैत्री केली.

नवीन कश्यप याने त्याच्या सोबतचे अश्लील फोटो व मिनाक्षीने पुर्वी त्याला दिलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. आरोपी नवीन कश्यप याने सदर विवाहितेला ब्लॅकमेल करुन तिच्याकडून तब्बल १२ लाख ५८ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम उकळल्यानंतर देखील त्याने विवाहितेचे नग्न फोटो व त्याच्यासोबतचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे मागण्यास सुरुवात केली. खारघर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खंडणीखोराच्या मोबाइलवर वॉच ठेवून त्याचा ठावठिकाणी शोधला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हिमाचल प्रदेश येथे पथक पाठविण्यात आले होते. या पथकाने आरोपी नवीन कश्यप याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in