चांगल्या पावसामुळे भाज्या झाल्या स्वस्त ;एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात पुरवठा

१५ दिवस पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना एपीएमसी बाजारात भाज्या आणण्यासाठी वेळ मिळाला
चांगल्या पावसामुळे भाज्या झाल्या स्वस्त ;एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात पुरवठा

चांगल्या पावसामुळे भाज्या स्वस्त झाल्या असून एपीएमसी बाजारात त्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे घाऊक व किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव उतरले आहे. काही भाज्या ४० रुपये किलो दराने मिळत असल्याचे दिसून येते.गेले १५ दिवस पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना एपीएमसी बाजारात भाज्या आणण्यासाठी वेळ मिळाला. ११ ऑगस्ट रोजी ५९६ भाज्यांच्या गाड्या एपीएमसी बाजारात आल्या. १५ दिवसात पहिल्यांदाच भाज्यांचा एवढा मोठा पुरवठा बाजारात झाला आहे.त्यामुळे बहुतांशी भाज्यांची किंमती कमी झाल्या आहेत, असे एपीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.फ्लॉवर ४० ते ५० रुपये (कि.), शेवग्याच्या शेंगा ८० रुपये, वांगी ३० ते ४० रुपये (कि.), सिमला मिरची ४० रुपये (कि.) , गाजर ४० ते ५० रुपये (कि.), हिरवा वाटाणा १२० रुपये (कि.), पालकची जुडी १० ते १५ रुपयाने उपलब्ध आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in