मग, आत्मनिर्भर भारताची घोषणा तरी कशाला?

या देशात महिलांचा सन्मान होऊ शकत नाही तर तुमच्या या उष्ट्या आत्मनिर्भर भारतच्या भाकडं कथा कुणाला सांगता?
मग, आत्मनिर्भर भारताची घोषणा तरी कशाला?

नवीन संसद भवनाचे उदघाटन होत असताना हाकेच्या अंतरावर जंतर -मंतर येथे आपल्या हक्कासाठी आत्मसन्मानसाठी कुस्तीगीर महिलांना पोलीस फरपटत घेऊन जात होते. कारण त्यांच्यावर होत असलेल्या लैंगिक शोषण करणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी हीच त्यांची माफक मागणी होती. ती मागणी आत्मनिर्भर भारतच्या बाता मारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करू नये मग कशाला उगाच आत्मनिर्भरच्या गोष्टी करता? या देशात महिलांचा सन्मान होऊ शकत नाही तर तुमच्या या उष्ट्या आत्मनिर्भर भारतच्या भाकडं कथा कुणाला सांगता? ज्यावेळी या कुस्तीगीर महिलांना फरपटत पोलीस घेऊन जात होते ते चित्र पाहून देशातल्या १४० कोटी जनतेची मने पिळवटून जात होती. अंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांना बुटानी मारहाण केली जात होती. जणू काही कुस्तीगीर कट्टर दहशतवादी आहेत. या देशात महिलांचा आत्मसन्मान होत नसेल तर आत्मनिर्भर भारतची घोषणा तरी कशाला?

- दत्ता श्रावण खंदारे, धारावी

logo
marathi.freepressjournal.in