शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास गुन्हा दाखल होणार; फडणवीसांची बँकांना तंबी

शिवसेना-भाजप सरकार शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे म्हटले आहे.
शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास गुन्हा दाखल होणार; फडणवीसांची बँकांना तंबी

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शेतकऱ्यांच्या कर्जावर बोलताना बँकांना तंबीच दिली आहे. शेत शिवार, शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज आणि बॅंकांकडून दिले जाणाऱ्या कर्जावर बोलताना त्यांनी राज्यातील शिवसेना-भाजप सरकार शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी संकट काळात खचून जाऊ नये. तसेच कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे देखील सांगितले.

शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याच्या प्रश्नावर त्यांनी अॅग्रीकल्चर फिडरचा सोलरिझेशन करण्यात येत असल्याचे सांगितले. या उपक्रमाची सुरवात ही 2018 मध्ये झाली होती. मात्र मध्यंतरी ही योजना फक्त कागदावर होती. आता पुन्हा नव्याने ही योजना सुरु करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मुद्यांना हात घातला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्वार घेण्यात येणार आहेत. एकरी 50 हजार रुपये प्रतिवर्ष असे तीस वर्षाकरिता या जमिनी घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी बोलताना कृषी कर्जाकरिता सिबिलची अट लागू होत नाही. हे कर्ज शॉर्ट टर्म असते. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसतील त्यांच्यावर गुन्हा नोंद करा, अशा सुचना यावेळी फडणवीस यांनी केल्या.

यावेळी फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नसतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना देणार असल्याचा पुनरोच्चार करत हे खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in