मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल ; सर्वत्र जोरदार स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांसह कामाख्या देवीचे नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला आले आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल ; सर्वत्र जोरदार स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज आमदारांसह गुवाहाटीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार तिथे जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, गुवाहाटीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले होते. त्यांच्यासह सर्व आमदारांनी तेथे कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांसह कामाख्या देवीचे नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला आले आहेत. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह आज मुंबईहून गुवाहाटीला रवाना होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी हे शहर चर्चेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याची तयारी काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. 

एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रातच नव्हे, तर गुवाहाटीतही क्रेझ असल्याचे दिसून येत आहे. आज अनेकांनी गुवाहाटी विमानतळावर प्रवेश करत त्यांच्या स्वागतासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यात तरुण-तरुणींनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in