वायकरांच्या मेहुण्यासह दोघांविरुद्ध गुन्हा; मतदान केंद्रावर मोबाईल नेणे महागात पडले

लोकसभा निवडणुकीत उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडीलकर आणि निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांच्याविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वायकरांच्या मेहुण्यासह दोघांविरुद्ध गुन्हा; मतदान केंद्रावर मोबाईल नेणे महागात पडले
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडीलकर आणि निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांच्याविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी मंगेश पंडीलकर यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून तो कलिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला आहे. त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे. मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरण्यास सक्त मनाई असताना मंगेश पंडीलकर यांनी त्यांच्याकडील मोबाईलचा वापर केला तर त्यांना मोबाईल वापरण्यास दिनेश गुरव यांनी परवानगी दिली होती. त्यामुळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावरील घटना ही उमेदवाराच्या सहाय्यकाने अधिकृत व्यक्तीचा मोबाईल फोन अनधिकृतपणे वापरल्याची घटना असून यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याचे वंदन सूर्यवंशी म्हणाल्या.

'ईव्हीएम' अनलॉक करण्यासाठी मोबाईल फोनवर ओटीपी येत नाही. कारण त्यात 'वायरलेस कम्युनिकेशन' क्षमता नाही. याबाबत चुकीची माहिती काही माध्यमातून पुढे आली आहे. 'ईव्हीएम' ही 'ईव्हीएम' सिस्टीमच्या बाहेरील कोणत्याही 'वायर्ड' किंवा 'वायरलेस कनेक्टिव्हिटी'शिवायची स्वतंत्र उपकरणे आहेत. यात कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ शकत नाही. यासंदर्भातील मतमोजणीचा सर्व घटनाक्रम उमेदवारांच्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नोंदविण्यात आला आहे. ईटीपीबीएसची मतमोजणी मतपत्रिका स्वरूपात होते, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नाही. ईटीपीबीएस आणि ईव्हीएम मोजणी आणि पोस्टल मतपत्रिका मोजणीसाठी प्रत्येक टेबलावरील प्रत्येक मोजणी पत्रकावर मतमोजणी प्रतिनिधीची स्वाक्षरी घेण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. ईव्हीएमबाबत चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या वृत्तपत्रांना नोटीस बजावण्यात आल्याचेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in