
पुण्याच्या ससून रुग्णालयात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आता शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांचं नाव पुढे आलं आहे. ठाकरे गटच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दादा भुसेंवर गंभीर आरोप केला आहेत. दादा भुसे यांनीच ललित पाटीलला ससूनमध्ये पाठवण्यास सांगित्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत अशी मागणी देखील अंधारे यांनी केली आहे.
याप्रकरणी बोलताना सुषणा अंधारे म्हणाल्या की, काल नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. तसंच काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी देखील सांगितलं की, या प्रकरणात शिंदे गटाच्या आमदाराचा हात आहे. म्हणजे सर्वांना याची माहिती आहे. मात्र, नाव कोणी घेतलं नाही. पण मी थेट नाव घेऊन सांगते की, या प्रकरणात दादा भुसे यांच्या नावाभोवती संशयाचं धुकं असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केले जाऊ नतेय? त्यांना का प्रश्न विचारले जाऊ नयेत? जर गृहखात्याची खरंच इच्छाशक्ती असेल की या प्रकरणाचा छडा लावायची तर त्यांनी हा विषय स्पष्ट करायला हवा, असं सुषणा अंधारे म्हणाल्या आहेत.