
तुम्ही कितीही यात्रा काढल्या, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण केलात तरी हरकत नाही. आमची शिवसेना खरी असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दावा केला. केसरकर म्हणाले, ''एकनाथ शिंदे यांची बदनामी का सुरू आहे. ज्यांनी आमदारांना हाताळले, जिथे जिथे संकट आले तिथे ते धावत गेले. एकनाथ शिंदे यांनी लढा दिल्याने शिवसेना २५ वर्षांपासून सत्तेत आहे''.
तुम्ही अनिल परब यांचा फोन तपासा आणि उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला की नाही हे विचारा, असे केसरकर म्हणाले. उद्धव ठाकरे कोणाच्या फोनवरून फोन करतात हे आम्हाला माहीत आहे.
केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या लढ्यामुळे शिवसेना २५ वर्षे सत्तेत आहे. शिंदेनी केले म्हणून तुम्ही म्हणता ते चुकीचे आहे. तुम्ही एका भूमिकेशी ठाम रहा. लोकांची दिशाभूल करू नका. सर्व कार्यकर्ते निघून जातील म्हणून तुम्ही यात्रा काढता, तुम्ही त्यांना आधी भेटलात का? सामान्य शिवसैनिकांचा अपमान करू नका. आम्ही आदराने बोलतो, तुम्हीही आदराने बोला, कृपया शिवसैनिकांची दिशाभूल करू नका, असेही केसरकर म्हणाले.
शिवसैनिकांच्या मनात काही प्रश्न निर्माण होत असल्याने शिवसेनेचे काही नेते सोबत असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. दादा भुसे, संदिपान भुमरे, संजय राठोड माझ्यासोबत आहेत.शिवसेना नेते आज पत्रकार परिषदेत माझ्यासोबत आहेत. शिवसेना त्यांच्या रक्तातच नाही का? संजय राठोड यांचे लग्न ठरले तेव्हा तुरुंगात होते. भुमरे ५ टर्म वेळा झाले. किती काळ तुरुंगात गेले? याला शिवसेना म्हणतात. शिवसेना यासर्वांमुळे ताठ मानेने उभी आहे असे देखील केसरकर म्हणाले.