
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जवळच्या लोकांवर ईडीने केलेल्या छापेमारी केल्या प्रकरणी शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी पक्ष विभागला गेला असून आजची बैठक ही लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आहे. त्यासाठी जी साधने वापरली जात असतील ती आपण योग्य पद्धतीने वापरली पाहीजे. देशात, जगात काय घडतंय त्याच्या माहितीसाठी सोशल मीडियासारखी साधन महत्वाची आहेत. राज्यकर्त्यांकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे, अस शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, अनिल देशमुख १४ महिने तुरुंगात होते. मात्र त्यांनी मी काही केलं नाही त्यामुळे तुमच्यासोबत येणार नाही असं सांगितलं. पक्षांतर केलं म्हणजे काय केलं. भाजपच्या दावणीला जाऊन बसलेत. भाजप जे सांगले आज तेच त्यांना करावं लागतंय. आमच्या बाजूने या नाहीतर दुसऱ्या ठिकाणी पाठवू. दुसऱ्या जागेवर जाण्याच्या भीतीने आपले सहकारी त्यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. समाजातील लोक अशा व्यक्तींना आज नाहीतर उद्या जागा दाखवतील, असं देखील पवार म्हणाले.